चित्र-चरित्र

शशांक केतकर
शशांक केतकर
अभिनेता
१५ सप्टेंबर १९८५

शशांक केतकरनं ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. तिथंच काही काळ त्यानं नोकरीही केली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यानं पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंच’ जॉईन केला. इथल्या कामामुळे त्याला ‘कालाय तस्मे नम:’ ही मालिका मिळाली. त्यानंतरची शशांकची मालिका म्हणजे ‘स्वप्नांच्या पलीकडले’. परंतु, शशांकला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमधील ‘श्री’ या व्यक्तिरेखेमुळे. टीव्हीवरील लोकप्रियतेमुळे शशांकचा चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. ‘वन वे तिकीट’ आणि ‘३१ दिवस’ हे दोन चित्रपट त्यानं केले आहेत.

-मंदार जोशीचित्र-चरित्र