चित्र-चरित्र

प्रियदर्शन जाधव
प्रियदर्शन जाधव
अभिनेता
२९ एप्रिल १९८०

मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटामधील सध्याचे आघाडीचे नाव म्हणजे प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शन मूळचा कोल्हापूरचा. २०१०मधील ‘विजय असो’ चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘हापूस’ या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून काम केले. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ या चित्रपटाची पटकथा त्याने लिहिली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या ‘सीक्वेल’मध्ये लेखन आणि मुख्य भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. ‘धिंगाणा’, ‘हंपी’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘हलाल’, ‘सायकल’ हे त्याचे इतर काही चित्रपट. ‘फू बाई फू’मधील त्याच्या ‘स्कीट्स’ खूप गाजल्या. ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेमधील त्याची भूमिका गाजली. ‘जागो मोहन प्यारे’ या नाटकाद्वारे त्याने रंगभूमीवरही चमकदार कामगिरी केली आहे.

'धुरळा', 'ये रे ये रे पैसा-२' या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. 'मस्का', 'चोरीचा मामला' या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून त्यानं केलेल्या कामगिरीचं प्रेक्षकांनी स्वागत केलं. २०२२ मध्ये प्रियदर्शन यांनी 'टाईमपास 3' या चित्रपटाचं लेखन केलं होतं. तसेच 'गोदावरी' या चित्रपटात अभिनय देखील केला होता.

मंदार जोशी



चित्र-चरित्र