चित्र-चरित्र

अभिजीत खांडकेकर
अभिजीत खांडकेकर
अभिनेता
७ जुलै १९८६

मराठी चित्रपट तसेच मालिका क्षेत्रात काम करणारा आघाडीचा अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. अभिजीतचे सर्व शिक्षण पुण्यात झाले. कला क्षेत्रामधील ओढा पाहून त्याच्या पालकांनी त्याला या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली. त्याचं त्यानं सोनं केलं. सुरुवातीचा काही काळ त्यानं ‘रेडिओ जॉकी’ (आरजे) म्हणून काम केलं. बऱ्याच कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही त्यानं केलं. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या यशानं तो घराघरात पोचला. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही त्याची मालिका मराठी टीव्ही क्षेत्रामध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरली. मालिका क्षेत्र गाजविल्यानंतर अभिजीतनं आपलं लक्ष चित्रपट माध्यमाकडे वळवलं. ‘भय’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘ढोल ताशे’, ‘एक दुसरे के लिए’ हे त्याचे उल्लेखनीय चित्रपट.
मंदार जोशीचित्र-चरित्र