सचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….
——
‘लव्ह यू जिंदगी’ची निर्मिती करावी असं तुम्हांला का वाटलं?
: सिनेमाची आवड मला पहिल्यापासून होती. कॉलेजमध्ये असताना महिन्यातून तीन-चार चित्रपट तरी मी पाहायचोच. अगदी लहानपणी मला घरच्या परिस्थितीमुळे चित्रपट बघता आले नाहीत. त्या काळात आमच्या घरी टीव्ही नव्हता. तेव्हा दर रविवारी सायंकाळी टीव्हीवर चित्रपट दाखविले जात असते. तेव्हा शेजार्यांच्या घरी जाऊन मी टीव्हीवर मराठी चित्रपट पाहत असे. तो काळ सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराङ्ग, महेश कोठारे यांचा होता. माझ्यासारखी चित्रपटांची आवड असलेली अनेक मुलं या घरात जमली असल्यामुळे घरातही हा चित्रपट ‘हाऊसफुल’ होई. पुण्यामध्ये आल्यानंतर मग चित्रपटगृहांमध्ये जाऊन मी चित्रपट पाहायला लागलो. चित्रपट ही ग्लॅमरस दुनिया असल्यामुळे प्रत्येकाला या क्षेत्रात आपण प्रवेश करावासा वाटतो. पडद्यावर ‘हीरो’ म्हणून आपण दिसावं असंही अनेकांना वाटत असतं. अगदी ‘हीरो’ची भूमिका नाही मिळाली तरी एखादी छोटीशी भूमिका तरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, अभिनय ही काही निव्वळ हौसेमौजेची गोष्ट नाही. त्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण येणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मीदेखील अभिनयापासून लांबच होतो. परंतु, कालांतरानं माझ्या मूळ व्यवसायामध्ये जम बसवल्यानंतर चित्रपट निर्मितीच्या निमित्तानं आपण या क्षेत्रात प्रवेश करावा असं मला वाटलं. ‘लव्ह यू जिंदगी’ या चित्रपटाची गोष्ट मला खूप आवडली नि मी चित्रपट निर्माता बनलो.
चित्रपटाचं नेमकं कथानक काय आहे ?
या चित्रपटामध्ये ५०-५५ वर्षांच्या एका व्यक्तीची कहाणी दाखविण्यात आली आहे. या व्यक्तीच्या आयुष्यात ङ्गारसं काही घडलेलं नाही. केवळ काम नि संसार एवढंच त्यानं आतापर्यंत केलं आहे. त्याच्या मुलीचं लग्न झालेलं असतं. जेव्हा तरुण पिढीतील मुलं जेव्हा त्याला ‘काका’ नावानं हाक मारतात किंवा त्याला कोणी तुमचं वय झालंय असं म्हटलं की ते आवडत नसतं. या व्यक्तीला असं वाटत असतं की माझ्या आयुष्याचा अजूनपर्यंत नीट आनंद घेतलेला नाही. चांगलं आयुष्य अजून मी जगलेलो नाही, परंतु ते मला जगायचं आहे, असं सतत त्याला वाटत असतं. परंतु, चित्रपटात नंतर अशा काही घटना घडतात की त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं. नंतर तो अत्याधुनिक बाईकवरून डोंगर-दर्यातल्या रस्तांवर ङ्गिरतो, आउटिंग करतो. पार्टीला जातो. नृत्य करतो. साधारणपणे पन्नाशीच्या वयोगटामधील बहुतेकांना आपण आपलं आयुष्य आणखी एन्जॉय करावंसं वाटतं. आपण आपल्या आयुष्यावर प्रेम करायला पाहिजे, असंही अनेकांना वाटतं. जे आपल्या मनात येतं, त्याचा आपण मनसोक्त आनंद लुटायला पाहिजे. आयुष्य हे खूप लिमिटेड असून ते प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल, याची कोणालाच काही कल्पना नाही. उद्या आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, याची आज आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे आजच्या दिवसापर्यंत तरी तुम्ही आयुष्य जगून घ्या. हा संदेशही या चित्रपटातून देण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रात माझे दोन मित्र आहेत. त्यांच्याशी ओळख असलेले मनोज हे दिग्दर्शक माझ्या संपर्कात आले. त्यांनी मला चित्रपट निर्मिती करण्याचा विचार आहे का, असं विचारलं. तेव्हा मी त्यांना गोष्ट मला आवडली तर नक्कीच निर्मितीचा विचार करीन असं उत्तर दिलं. त्यानुसार मनोज सावंत यांनी या चित्रपटाची गोष्ट ऐकवली. ती ऐकल्यानंतर लगेचच हा चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला. साधारणपणे दीड वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या निर्मितीस आम्ही सुरुवात केली.
प्रत्यक्ष शूटिंगचा अनुभव कसा होता?
– या चित्रपटासाठी आम्ही ३२ दिवस शूटिंग केलं. त्यापैकी बराच काळ मी सकाळपासून सायंकाळपर्यंत शूटिंगस्थळी उपस्थित राहायचो. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आमच्या सेटवर स्वप्निल जोशी, अली असगर, श्रिया पिळगांवकर अशी नामवंत मंडळी आली होती. त्यामुळे अगदी घरगुती वातावरणात आमचं हसतखेळत शूटिंग सुरू झालं आणि ते शेवटपर्यंत तसंच राहिलं.
चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान काही अडचणी आल्या का नि तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत?
पहिलीच निर्मिती असल्यामुळे अडचणी येणं स्वाभाविक होतं. सर्वात मोठी अडचण आली ती अर्थकारणाची. सुरुवातीला या चित्रपटाच्या निर्मितीसाठी माझ्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. परंतु, चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर दुसर्या व्यक्तीकडून पैशांची उभारणी झाली नाही. त्यामुळे काही दिवस आमचं शूटिंगही थांबलं होतं. परंतु, मग मीच निर्णय घेतला की आता आपण एकट्याच्या बळावरच हा चित्रपट पूर्ण करायचा नि तसा मी तो केलादेखील. चित्रपट पूर्ण केल्यानंतर काही ‘प्रेझेंटर’नाही मी भेटलो. परंतु, हवी तशी बोलणी न झाल्यानंतर या चित्रपटाचा सादरकर्ताही मीच झालो आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीची स्ट्रॅटेजी काय आहे?
साधारणपणे दोनशे ते सव्वादोनशे चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करणार आहोत. तत्पूर्वी वेगवेगळ्या इव्हेंट्सद्वारे या चित्रपटाची चांगली प्रसिद्धी होईल याची आम्ही काळजी घेणार आहोत.
‘लव्ह यू जिंदगी’नंतर कशा प्रकारचे चित्रपट निर्मिण्याचा तुमचा विचार आहे?
‘लव्ह यू जिंदगी’ प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच आम्ही दुसर्या चित्रपटाच्या ‘स्क्रीप्ट’वरही काम सुरू केलं आहे. मला स्वत:ला रेंगाळणारे चित्रपट आवडत नाहीत. पडद्यावर सतत काहीतरी घडणारे चित्रपट मला आवडतात. तशाच पद्धतीचा आमचा आत्ताचा चित्रपट असूनही पुढील चित्रपटही तसाच राहील.
काही निवडक प्रतिक्रिया:
प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर
लेखिका जयश्री दानवे यांनी बेबीनंदा यांच्याविषयीचा लेख अप्रतिम पद्धतीनं सादर केलेला आहे . विविध संदर्भांचा मुळे हा लेख वाचनीय झालेला आहे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया