अतिथी कट्टा

दिनांक : १५-०४-२०१८

‌’राष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर’

या वर्षी राष्ट्रीय चित्रपट पारितोषिकांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ आसामी चित्रपटाला गेला असला तरीही राष्ट्रीय पारितोषिकात मराठी सिनेमाने आपली मोहर उमटवलेली आहेच.
——–

६४ व्या राष्ट्रीय पारितोषिकाच्या पंचमंडळाचे अध्यक्ष नट – दिग्दर्शक शेखर कपूर प्रादेशिक चित्रपटांची पारितोषिके जाहीर करताना म्हणाले ‘बंडार्ट क्वीन ‘ नंतर चित्रपट दिगदर्शनांतून मी निवृत्त झालो कारण त्या काळात जो हिंदी सिनेमा बनत होता त्याचा दर्जा फारच चांगला नव्हता. या वर्षी पारितोषिक निवडीसाठी चित्रपट पहाताना मला असे जाणवले की, प्रादेशिक चित्रपटात प्रयोगशीलता खूपच आहे. या वर्षीच्या पारितोषिकात प्रादेशिक सिनेमाचे प्रतिनिधित्व उत्तम आहे.

शेखर कपूर यांच्या उद्गाराचे प्रत्यंतर राष्ट्रीय पारितोषिकावर प्रादेशिक चित्रपटांत मराठी चित्रपटांना आपली मोहोर लक्षात यावी अशी उमटवलेली आहे. विशेष म्हणजे नव्या दिग्दर्शकांचे यश हे कौतुकास्पद आहे. पहिला चित्रपट असूनही अनेक विभागात हे यश लक्षात येते. पुण्याच्या प्रायोगिक रंगमंचावर काम करणाऱ्या निपुण धर्माधिकारीला ‘धप्पा’ चित्रपटासाठी राष्ट्रीय ऐक्याचे ‘नर्गिस दत्त’ पारितोषिक मिळाले. तर अमर देवकर दिग्दर्शित पहिल्याच ‘म्होरक्या’ या चित्रपटाला श्रेष्ठ बालचित्रपट पुरस्कार लाभला. एवढेच नव्हे तर त्यातील भूमिकांसाठी यशराज कऱ्हांडे या मुलाला पंचाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. नट प्रसाद ओक ने प्रथमच दिग्दर्शित केलेला ‘कच्चा लिंबू ‘ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान मिळाला.

निपुण धर्माधिकारी रंगमंचावर प्रायोगिक नाटके दिग्दर्शित करतो. ‘फॉर्बस’ मासिकाने प्रायोगिक रंगमंचाचे त्याने पुनरुपजीवन केले असा त्याचा गौरव केलेला आहे. ‘धप्पा’ ला नरगिस दत्त पारितोषिक मिळाले हे एकून त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

या वर्षीच त्याचा ‘बापजन्म’ हा चित्रपट प्रकाशीत झाला. पण ‘धप्पा’ हा चित्रपट त्याने त्याआधीच सुरु केला होता. तो पूर्ण व्हायला वेळ लागला. एक तर ‘धप्पा’ मध्ये सारे नवीन कलाकार आहेत. १९ नव्या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे कथानक लहानमुलांच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मतेची कथा मांडते. धर्माधिकारी म्हणाले पुरस्कार मिळाल्यामुळे येत्या दिवाळीच्या सुट्टीत चित्रपट प्रकाशित करणे सुलभ होईल.

अमोल देवकर च्या म्होरक्याला यंदाच्या राज्यपुरस्कारात नामांकने मिळालेली आहेत. अमोल म्हणाला ज्या अनेक अडचणी झेलून मी हा चित्रपट पूर्ण केला त्याचे सार्थक झाले आहे असे पुरस्कार मिळताच मला वाटले. चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यासाठी मला घरचे शेत गहाण ठेवून पैसे उभे करायला लागले नंतर मला निर्माता मिळाला तरीही चित्रपटाचे बजेट छोटेच होते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या.

मराठी चित्रपटांतील नट प्रसाद ओक चा ‘कच्चा लिंबू’ हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे. ‘कच्चा लिंबूची’ कथा एका मनोरुग्ण मुलाची सेक्स ची इच्छा यावर बेतलेला आहे. त्याच्या आईवडिलां समोर हे एक आव्हानच होते. “माझ्या साठी हा पुरस्कार म्हणजे स्वप्नपूर्तीचा आनंद आहे”. असे प्रसाद ओक म्हणाला.

दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘सैराट’ च्या यशामुळे आता प्रस्थापित दिग्दर्शक बनला आहे. त्याला ‘पावसाचा निबंध’ या डॉक्युमेंट्रीसाठी सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. मंजुळेंचे हे चौथे राष्ट्रीय पारितोषिक आहे.

मंजुळे म्हणाला २०१२ साली हा माहिती पट मी लिहिला होता. पण त्यावेळी पैशाच्या कमतरतेमुळे मी तो निर्माण करू शकलो नाही. आणि फॅन्ड्री आणि सैराटमध्ये मी व्यस्त असल्याने हा माहितीपट मागे राहिला. पुरस्काराचे श्रेय मी माझ्या टीमला देतो. अविनाश सोनावणे याला ध्वनिमुद्रणाचे पारितोषिक मिळाले आहे.

सुधीर नांदगावकर
आधार इंडियन एक्स्प्रेस

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया