अतिथी कट्टा

दिनांक : १३-०८-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी

‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीवर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे. मैत्रीचे नवे पैलू उलगडणारा ‘दोस्तीगिरी’ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार या टीमशी मारलेल्या गप्पा.

——

‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा एका सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वप्नांचा प्रवास सादर करणारा सिनेमा आहे. या चित्रपटाचं ‘ट्रकभर स्वप्नं’ हे शीर्षकच मला खूप आवडलं. आपल्या सर्वांनाच स्वप्नं पाहायला खूप आवडतात. मात्र आपण स्वप्नं काही एक-दोन बघत नाही. ती दररोज आणि शेकडो, हजारो पाहतो. त्यामुळेच ‘ट्रकभर स्वप्नं’ हे शीर्षकच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले असं मला वाटतं. आजवर मी तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तमिळ अशा विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र मराठीत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव मला मिळाला. खरं तर मी फार मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. यापूर्वी मी ‘बालगंधर्व’ चित्रपटामध्ये झळकलो होतो. या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. त्याला मोठं यश मिळालंही होतं. हा चित्रपट पाहून मला अनेकांचे फोन आले होते. परंतु, मराठी भाषाच समृद्ध असल्यामुळे या भाषेत काहीतरी चांगली भूमिका आली तरच ती आपण करायची असं मी ठरवलं होतं. त्यामुळे ‘बालगंधर्व’नंतर माझा मराठी नवीन सिनेमा यायला इतकी वर्षं लागली.

‘ट्रकभर स्वप्न’ची ऑफर खरं तर मी यातील व्यक्तिरेखेच्या प्रेमाखातर स्वीकारली. आजवर मी विविध भाषांच्या सिनेमांमध्ये नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण या सिनेमातील व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. हा लोकांना पैसे देतो, पण त्या बदल्यात अपेक्षाही करतो. या निमित्ताने मराठी भाषेचा स्वाद चाखता आला. या चित्रपट म्हणजे एका जोडप्याची संघर्षाची कथा आहे. ट्रकभर स्वप्नं असलेलं हे जोडपं ती प्रत्यक्ष साकारण्यासाठी कसं झगडतं ते या चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मी मराठी चित्रपट हा पैशासाठी करीत नाही. त्यातून कामाचा मिळणारा आनंद हा सर्वात मोठा आहे. मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये मला दिग्गज कलाकार, दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळते. त्यांच्याकडून बरंच काही शिकता येतं.

‘ट्रकभर स्वप्नं’च्यावेळीही मला नेमका हाच अनुभव आला. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रमोद पवार हे मराठीतील नामवंत अभिनेते असल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर वाढला. अतिशय खेळकर वातावरणात या सिनेमाचं चित्रीकरण कधी पूर्ण झालं ते समजलंच नाही. प्रवीण तरडे यांचं लेखन खूप चांगलं आहे. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर या सर्व कलाकारांबरोबर काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. मकरंद देशपांडे तर तगडा अभिनेता आहेच. रंगभूमीवर त्यानं इतकी वर्षं काम केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून खूप काही मी शिकलो. क्रांती रेडकरचा या चित्रपटामधील अभिनय पाहण्यासारखा आहे. थोडक्यात एक चांगला चित्रपट केल्यामुळे मला मजा आली. त्यामुळे भविष्यातही मी आणखी बरेच मराठी चित्रपट करण्यास इच्छुक आहे.

– मुकेश ऋषी

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

  लेखिका जयश्री दानवे यांनी आपले वडील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या सांगितलेल्या आठवणी या मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत.

  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया