अतिथी कट्टा

दिनांक : ०७-०८-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌मैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी

‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीवर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे. मैत्रीचे नवे पैलू उलगडणारा ‘दोस्तीगिरी’ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार या टीमशी मारलेल्या गप्पा.

——

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित ’दोस्तीगिरी’ सिनेमाचं लेखन मनोज वाडकर यांनी केलं आहे. अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स प्रस्तुत मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित ’दोस्तीगिरी’ या चित्रपटाच्या मार्केटिंगची धुरा सांभाळली आहे ती ‘ड्रीमर्स पीआर’ यांनी. महाविद्यालयातील नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्यावर हा चित्रपट आधारला आहे. संकेत पाठक, पूजा मळेकर, विजय गीते, पूजा जयस्वाल, शुभांगी लाटकर आणि अक्षय वाघमारे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते रोहन-रोहन यांनी आणि त्यामधील गीतं गायली आहेत ती प्राजक्ता शुक्रे, मीनल जैन, कविता राम आणि आदर्श शिंदे यांनी.

या चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे ते मनोज वाडकर यांनी. ते या चित्रपटाबद्दल म्हणाले, माझा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथा-पटकथा आणि संवाद मी लिहिले आहेत. या चित्रपटाचं कथानक मला अवघ्या दोन तासांमध्ये सुचलं. त्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये मी संपूर्ण कथा-पटकथा आणि संवाद कागदावर उतरवले. माझं हे लेखन अगदी झटपट होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामधील बरेचसे प्रसंग हे माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेले आहेत. त्यामुळे ते कागदावर उतरवणं मला खूप सोपं गेलं. या चित्रपटाची कथा ही सर्वसामान्य माणसांची आहे. त्यामुळे प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना तो आपला वाटेल. मराठी चित्रपटांच्या यशामध्ये संगीताचा खूप मोठा वाटा असतो. ्‘दोस्तीगिरी’चं संगीत खूप छान बनलंय असं मला वाटतं. आमच्या चांगल्या कथानकाला उत्कृष्ट संगीत देऊन संगीतकार रोहन-रोहन यांनी सोने पे सुहागा असं काम केलं आहे.

दिग्दर्शक विजय शिंदे म्हणाले, मैत्री या विषयावर आजवर खूप सारे चित्रपट यापूर्वी बनलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकात काय वेगळेपण असेल अशी मलाही शंका होती. परंतु, मनोज वाडकर यांनी चित्रपटाचं कथानक ऐकवल्यानंतर मला त्याचं वेगळेपण लक्षात आलं. यापूर्वीचे मैत्रीवरचे चित्रपट हे ङ्गक्त मौज-मस्ती यावरच आधारलेले होते. परंतु, मैत्रीही गांभीर्याने केली पाहिजे, असं सांगणारा चित्रपट अजूनपर्यंत बनलेला नव्हता. ती गोष्ट या चित्रपटामधून सांगण्यात आली आहे. प्रत्येकानं आपली मैत्री गांभीर्यानं जपली पाहिजे असा संदेश आम्ही या चित्रपटामधून दिला आहे. संपूर्ण मनोरंजन पॅकेज असं या चित्रपटाचं रूप आहे. आम्ही या चित्रपटाचा लुक खूप छान ठेवला आहे. खूप सुंदर सुंदर लोकेशन्सवर आम्ही हा चित्रपट चित्रीत केला आहे. त्यामुळे हा चित्रपट दिसायला खूप चांगला झाला आहे. हा चित्रपट पाहताना प्रत्येकाला आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींची आठवण होईल.

‘दोस्तीगिरी’ला संगीत दिलं आहे ते रोहन-रोहन या सध्याच्या लोकप्रिय जोडीने. ते या चित्रपटाच्या संगीताबद्दल म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्याच निर्मात्यांना ‘सेफ’ खेळायचं असतं. मात्र या चित्रपट निर्मात्यांनी रीस्क घेत नवीन कलाकारांना घेतलं. त्यामुळे आम्हालाही संगीतासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीला पुढे नेण्यासाठी नवनवीन कलाकारांना संधी देणं आवश्यक आहे. ‘दोस्तीगिरी’च्या रुपानं ती संधी मिळालीय असं आम्हाला वाटतं. या चित्रपटाचं संगीत देण्यासाठी आम्हाला खूप स्वातंत्र्य मिळालं. आम्हाला हवे ते गायक मिळाले. एखाद्या संगीतकारासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी या चित्रपटासाठी बनवू शकलो.

या चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारा विजय गीते म्हणाला, सिड नावाची व्यक्तिरेखा मी साकारली आहे. हा गरीब घरातील साधा, भोळा, शांत मुलगा नसून तो उनाड, अतरंगी, खोडकर आहे. ही व्यक्तिरेखा खूप सहजतेनं मी साकारलीय. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदेसर यांच्याबरोबर मी यापूर्वीही काम केलं असल्यामुळे मजा आली. आमचं चांगलं बॉंडिंग होतं. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी रोमँटिक गीत चित्रीत करताना खूप मजा आली. सुरुवातीला टेन्शन होतं. परंतु, सगळ्यांच्या सहकार्यामुळे शूटिंग चांगलं झालं.

सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा संकेत पाठक म्हणाला, हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी मला अक्षय वाघमारे, विजय गीते, पूजा जयस्वाल, पूजा मळेकर असे जीवाभावाचे फ्रेंड्स मिळाले.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया