अतिथी कट्टा

दिनांक : ०७-०२-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌मॅड कॉमेडी म्हणजे ‘लकी’…
‘दुनियादारी’, ‘तू हि रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ आदी यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक संजय जाधव ‘लकी’ चित्रपट घेऊन येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करणार्‍या जाधव यांनी ‘लकी’द्वारे अभय महाजन आणि दीप्ती सती यांना पदार्पणाची संधी दिली आहे. या चित्रपटाबद्दल या तिघांशी केलेली ही चर्चा.

——

आपल्या पहिल्याच व्यावसायिक चित्रपटात कमरेला ङ्गक्त एक ट्युब टायर लावून निर्वस्त्रपणे रस्त्यावर धावत फिरणाऱ्या अभय महाजनचा ‘बोल्ड’ अवतार सध्या मराठी सिनेसृष्टीत चर्चाचा विषय बनलाय. बॉलिवुड हिरोने शर्टलेस असणं हे ‘कूल’ मानलं जातं. पण कपडे काढून निर्वस्त्र हिडणं हे मराठी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी आजही बोल्डच आहे. त्याबद्दल अभय म्हणाला, ‘‘काहीतरी सेन्शेसनल करून लोकांचे लक्ष वेधून घेणं, असा काही ह्यामागे अर्थातच उद्देश नव्हता. सिनेमातल्या एका सीनमध्ये अशापद्धतीने निर्वस्त्र धावण्याचा प्रसंग माझ्यावर येतो. फिल्ममध्ये मी लकीच्या भूमिकेत आहे. ज्याचे आयुष्यात ‘…’ लागलेले आहेत. त्याचा परिचय असा व्हावा, असं चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टिमला वाटल्यामुळे माझे पहिले पोस्टर असे आले.

सिनेमाचे चित्रीकरण गोव्यात झाले आहे आणि गोव्याच्या रस्त्यावर अभय असा धावताना दाखवला आहे. ह्या अनुभवाविषयी अभय सांगतो, ‘‘संपूर्ण सिनेमातला हा सर्वात कठीण भाग होता. कारण आम्ही ऑक्टोबर महिन्यात गोव्यात शूटिंग करत होतो. उष्माघाताने आमच्या युनिटमधलेही दोन-तीन लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. अशावेळी आजारी न पडता, उघडं रस्त्यावर फिरण्याची जबाबदारी होती. मी जवळ-जवळ सात दिवस सलग गोव्याच्या रस्त्यांवरून त्या टायर घातलेल्या अवतारात बिनाकपड्यांचा फिरत होतो.’’

आत्तापर्यंत प्रायोगिक सिनेमांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये दिसणारा अभय महाजन पहिल्यांदा एका व्यावसायिक सिनेमात दिसणार आहे. ह्याविषयी अभय सांगतो, ‘‘संजयदादा हे मराठीतले रोहित शेट्टी आहेत. उत्तम ब्लॉकबस्टर सिनेमा बनवायचं गणित ह्या दोघांनाही चांगलं जमतं. त्यामुळे दादांकडून कॉल येणं हे ङ्गिल्मइंडस्ट्रीत करियर करू इच्छिणार्‍या प्रत्येक अभिनेत्यासाठी स्वप्नवत असतं. मी स्वत:ला खूप लकी समजतो, की मला पहिला कमर्शिअल सिनेमा करायला त्यांच्यामुळे मिळाला आणि त्यात ‘कोपचा’ गाण्यात माझ्यासाठी बप्पी लाहिरींनी आवाज देणे, हे माझे भाग्य आहे.’’
लकी सिनेमाची गाणी आणि ट्रेलर आउट झाल्यावर अभयला सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अभय त्याबद्दल म्हणाला, ‘‘आम्ही नुकतेच पुण्याला प्रमोशनला जाऊन आलो. तिथे आम्हांला पाहण्यासाठी लोटलेली गर्दी पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. सिनेमा येण्याअगोदर प्रेक्षकांमध्ये आणि कॉलेज तरुणाईमध्ये ‘लकी’विषयी असलेली ही उत्सुकता पाहणं हे ‘ड्रिम कम ट्रू’ आहे.’’

‘लकी’ सिनेमामधून मराठी सिनेसृष्टीला दीप्ती सतीच्या रूपातून ‘साइज झिरो’ हिरोइन मिळाली आहे. या चित्रपटाद्वारे साउथ सेन्सेशन दीप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आपल्या पहिल्याच सिनेमात तिने चक्क टू-पिस बिकिनी घालून आपल्या सेन्शुअस लुकने पदार्पणातच तरुणांना वेड लावलं आहे. संजय जाधव ह्यांच्या सिनेमामध्ये असं पहिल्यांदाच होतंय की, त्यांची हिरोइन सिनेमात टू पिस बिकिनी घालून दिसतेय. मिस-इंडिया २०१४च्या टॉप-५ ङ्गायनलिस्टमधली सौंदर्यवती दीप्ती सती चार दाक्षिणात्य भाषांमध्ये सिनेमे करून बॉलिवुडऐवजी मराठीत पदार्पण करत असल्याने तिच्याविषयी आपोआपच एक उत्सुकता निर्माण झाली आहे. आजवरच्या चित्रपटप्रवासाबद्दल आणि संजय जाधव ह्यांच्या सिनेमात तू कशी आलीस? ह्याविषयी विचारणा केल्यावर दीप्ती म्हणाली, ‘‘ ‘मिस इंडिया पेजेंट’नंतर साउथमधून मला भरपूर ऑङ्गर्स आल्या. एकापाठोपाठ एक मी चारही दाक्षिणात्य भाषांमधून सिनेमे केले आणि एक दिवस संजयदादांच्या ऑङ्गिसमधून ङ्गोन आला. मला पहिल्यांदा वाटलं की, एवढे मोठे ‘दुनियादारी’सारखे सिनेमे करणारे ङ्गिल्ममेकर मला का कॉल करतायत, हे खरं असेल का? त्यांना भेटायच्यावेळी ही थोडं दडपण आलं होतं. पण दादा मस्तमौला आहेत. हे पहिल्या भेटीत समजल्यावर भीती चेपली आणि त्यांच्यासोबत सिनेमा करायला मिळणार ह्यांचा खूप आनंद झाला.’’

एरवी साऊथ सिनेमे झाल्यावर बॉलिवुड हे सरळसोप्पं गणित बर्‍याचशा अभिनेत्रींनी ठरवलेलं असतं. पण दीप्ती म्हणते, ‘‘सिनेमाला भाषेचं बंधन नसतं. कथानक काय आहे, हे मला महत्त्वाचं वाटतं आणि दादांसोबत कुणाला सिनेमा करावासा वाटणार नाही… त्यांचे ‘दुनियादारी’, ‘तू हि रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ सिनेमे मी पाहिलेत. मी लकी आहे की, मी दादांच्या लार्जर दॅन लाइफ स्वप्नांचा एक हिस्सा आहे.’’

दीप्तीने ‘लकी’मध्ये बिकिनी घातलीय. या बोल्ड लुकबद्दल विचारल्यावर ती म्हणते, ‘‘जसं आपण कॉलेजमध्ये जाताना जीन्स-टीशर्ट घालतो किंवा जीममध्ये जाताना जीमवेअर घालतो, तसेच स्विमींगपूलमध्ये जाताना मी स्विमवेअर घातलेले आहे. जेव्हा मला असा सीन करायचाय हे कळलं, तेव्हा पहिल्यांदा मी ऑकवर्ड झाले. पण नंतर मला लक्षात आले की, हा सिनेमाचा टर्निंग पॉइंट आहे. सीन एस्थेटिकली चित्रीत झालाय. तो कुठेही अश्लील वाटणार नाही.’’
‘कनव्हिक्शन का पैसा है बॉस’ असं म्हणतं लागोपाठ सुपरहिट सिनेमे देणारे ङ्गिल्ममेकर संजय जाधव ह्यांच्या सिनेमात सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी अशा मराठीतल्या मोठ्या सुपरस्टार्सना पाहायची प्रेक्षकांना सवय लागली होती. मात्र ह्या चेहर्‍यांना वगळून ‘नवा हिरो’, ‘नवी हिरोइन’ म्हणत, संजय जाधव ह्यांनी ‘लकी’मध्ये साउथ सेन्सेशन दिप्ती सती आणि वेबसीरिजमुळे युवावर्गात प्रसिद्ध असलेल्या अभय महाजनची निवड केली आहे.

ह्याविषयी संजय जाधव ह्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही म्हटलेले सगळे मराठीतले सुपरस्टार्स माझेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचेही लाडके आहेत. पण ‘लकी’ची कथा २०१९च्या कॉलेज तरुणांची आहे. त्या भूमिकेसाठी आत्ता कॉलेजमध्ये जात असणारे चेहरे वाटावेत, अशा ऍक्टर्सची गरज होती. त्यामुळे दिप्ती सती आणि अभय महाजनची निवड करण्यात आली. ह्या दोघांचीही निवड करण्याअगोदर कास्टिंग टिमने दोघांचेही आत्तापर्यंतचे काम पाहिले. त्यांची ऑडिशन आणि लुक टेस्ट घेतली. मग त्यांची निवड करण्यात आली.’’

दीप्ती सती आणि अभय महाजनच्या निवडीअगोदर सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, श्रेया बुगडे, स्पृहा जोशी, अमेय वाघ ह्या मराठीतल्या बड्या चेहर्‍यांनी आपणच ‘लकी’ असल्याचे व्हिडियो आपापल्या सोशल मीडियावर टाकले होते. जे व्हायरलही झाले होते. पण नंतर अभय-दिप्तीच्या निवडीने मराठी सिनेसृष्टीसोबतच संजय जाधव ह्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ह्याविषयी विचारल्यावर संजय जाधव म्हणाले, ‘‘हे ह्या सर्वांचं माझ्यावरचं निव्वळ प्रेम आहे. मी जे काही करतो त्याविषयी माझ्यापेक्षा जास्त उत्साहित हेच सर्व असतात आणि सई, सिद्धू, तेजू आणि उमेश तर तुम्हांला लकीच्या टायटल ट्रॅकमध्ये दिसतच आहेत. ह्या सर्व कलाकारांना मी माझ्या कुटूंबाचा अविभाज्य हिस्सा मानतो.’’

‘लकी’ सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर लॉंच झाला होता. त्यामधले संवादही चांगलेच गाजतायत. ‘बाकी सगळ्यांनी पटवलं होतं ते सामान, पण आपल्याला आवडलं होतं ते तुङ्गान’ असे संवाद सध्या तरूणांमध्ये व्हायरल झाले आहेत. बर्‍याच वर्षांनी पिटातल्या प्रेक्षकांना टाळ्या-शिट्या वाजवायला लावेल असा मराठी सिनेमा आल्यासारखं हा ट्रेलर पाहून वाटतंय. संजय जाधव ह्याविषयी सांगतात, ‘‘माझा सिनेमा पाहायला येणार्‍या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करून त्यांच्या आयुष्यातली टेन्शन्स विसरायला लावण्यासाठी मी सिनेमा बनवतो आणि त्यातले व्हायरल झालेले असे संवाद ही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती असते असं मला वाटतं. माझी फिल्म मॅड कॉमेडी आहे. सिनेमागृहात या, पोटभर हसा आणि खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन जा.’’

‘मॅड कॉमेडी’ सिनेमाची परंपरा सिनेसृष्टीत खरं तर दादा कोंडकेंनी सुरू केली. आता बॉलिवुडमध्ये असे मॅड कॉमेडी सिनेमे बनत आहेत. संजयलाही त्यांच्याजवळची लोकं ‘दादा’ म्हणतात. आता ती स्टाइल ऑङ्ग ङ्गिल्ममेकिंग पुन्हा एकदा मराठीत परततेय का? ह्यावर संजय जाधव म्हणतात, ‘‘दादा कोंडके हे खूप मोठे ङ्गिल्ममेकर होऊन गेले. त्यांच्या ‘स्टाइल ऑङ्ग मेकिंग’चा सिनेमा असं जर तुम्ही ‘लकी’ला म्हणालात, तर तो ‘लकी’चा आणि माझा दोघांचाही गौरव आहे. मी ङ्गक्त एवढेच म्हणेन, आजच्या काळातल्या कॉलेज तरूणांची भाषा वापरून हा सिनेमा आम्ही बनवलाय. जो बनवताना, कोणतेही कमरेखालचे विनोद न करता संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघता येईल असा सिनेमा

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया