अतिथी कट्टा

दिनांक : १५-०९-२०१७

वडील-मुलाच्या नात्यावरचा ‘बापजन्म’…



मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. त्या प्रयत्नांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘बापजन्म’ चित्रपट. निपुण धर्माधिकारी हा नव्या दमाचा दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सने केली आहे. सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे असून निर्मिती सुमतिलाल शाह यांची आहे. चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
——-

या चित्रपटाबद्दल सचिन खेडेकर म्हणाले, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. या चित्रपटामध्ये मी बापाची भूमिका साकारली आहे. अलीकडच्या काळात मला बापाच्या भूमिका बऱ्याच येत आहेत. विशेष म्हणजे माझे सगळेच बाप यशस्वी झाले आहेत. ”

‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारीनेच लिहीली आहे. तो म्हणाला, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे. ”

निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वूईथ अमेय अँड निपुण’ या वेबशोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला.

सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह या चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांच्या भूमिका आहेत. ‘बापजन्म’चे सादरीकरण ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडीयाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘टाईम प्लीज’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘एव्हरेस्ट’चे संजय छाब्रिया या चित्रपटाबद्दल म्हणाले, “आमच्या प्रत्येक चित्रपटामधून दरवेळी काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. नेमका असाच प्रयत्न या चित्रपटाबद्दल केला आहे. निपुणनं खूप छान पद्धतीनं हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. सचिन खेडेकर यांच्या अभिनयाबद्दल सर्वजण जाणतातच. या चित्रपटात ते कलाकार म्हणून आणखी काही पावलं पुढे गेले आहेत.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया