ठकसेन राजपुत्र
१९३४

अद्भुतरम्य
३५ मिमी/कृष्णधवल/१४४०६ फूट/१४१ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३६७१/२७-७-३४

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :दादासाहेब तोरणे
कथा :मामा वरेरकर
संवाद :द. का. काणे
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :एम्.एम्. पुरोहित
संकलक :आर. डी. थिटे
कला :जी.वाटेगांवकर, व्ही. गोखले
गीत मुद्रण :दातीर, द. का. काणे
ध्वनिमुद्रक :दातीर, द. का. काणे
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :मा. विठ्ठल, वसंतराव पहेलवान, दादा साळवी, गुरूजी, वर्णे, राम पाठक, किशोरी इंगळे, पिरोद, शकुंतला, सुंदराबाई, नैना बांदेकर, शांता हुबळीकर
गीते :१) सचैल नाहली हसती सुमे ही, २) आणित मनी का सकळा, ३) सख्या मोहूनि गेले, ४) घालीन भूल का सखये, ५) नमित मी अंबिके तुजला, ६) आला कुठुनि असा, ७) वैभव बा धन हीनता ये.
कथासूत्र :उज्जैनचा राजा विक्रम ह्याच्या मते स्त्रियांना काही किंमत नसते.पण त्याची पत्नी शशिकला त्याला आव्हान देते की,एक ना एक दिवस त्याला तिच्यापुढे वाकावेच लागेल.पुढे तिला शशांक नावाचा मुलगा होतो.हा मुलगा मोठा झाल्यावर राजवाड्यातून पळून जातो आणि 'ठकसेन'या नावाने चोरांच्या टोळीत सामील होतो.ठकसेनाच्या कारवायांना कंटाळलेला राजा ठकसेनाला अटक करण्याची कोतवालाला आज्ञा करतो.पण ठकसेन कोतवालालाच सापळ्यात अडकवतो.एवढंच नाही तर राजाचा मुकुटही चोरतो.शेवटी विक्रम त्याला शरण जातो.
विशेष :मराठी बरोबरच हिन्दी आवृत्ती ‘‘भेदी राजकुमार’’ (Mysterious Prince) दाखविण्यांत येत असे. या चित्रपटाबाबत एक मजेशीर गोष्ट - सरस्वती सिनेटोनचे कथालेखक, श्री डी.के.काणे यांनी पुढे एक चित्रसंस्था ‘‘चित्रवाणी प्रोडक्शन्स’’ स्थापून त्या बॅनरखाली हीच कथा ‘‘विक्रम शशिकला’’ उर्फ ‘‘कलंकशोभा’’ उर्फ ‘‘स्त्रीचरित्र’’ या नावाने हिन्दी मराठीतून पडद्यावर आणली. त्यांत मा. विठ्ठल, मोनिका देसाई, वसंतराव पहेलवान, इन्दुमती, मास्टर छोटू, वास्कर, केळकर, शंकरराव भोसले, इत्यादी कलाकारानी कामं केली होती. मराठी आवृत्तीतील (कलंकशोभा) दोन गाणी एच्.एम्.व्ही. ने रेकॉर्ड करून N-25034 ह्या नंबरची रेकार्ड विक्रीसही काढली होती. त्या गाण्यांचे बोल होते. ‘‘खेळत येत मधु घेऊनी’’ (गायक कुसुम सगुण) ‘‘दूर देशा बाळ जाई’’ (गायक विमल गवाणकर) ही दोन्ही गाणी दत्ताराम गाडेकर यांनी संगीतबद्ध केली होती.

सामायिक करा :

ठकसेन राजपुत्र - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती