पार्थकुमार
१९३४

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३९१५ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १२९४३/२-१-३४

निर्मिती संस्था :श्याम सिनेटोन कंपनी
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर, वाय. जी. घोरपडे
संगीत :गुंडोपंत वालावलकर
छायालेखन :जी. ए. कांबळे
संकलक :एम्. बी. कांबळे, वाय. डी. घोरपडे
कला :बाळ गजबर
ध्वनिमुद्रक :व्ही. एम्. घाटगे, एल्. पी. वालावलकर
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :मा. एरीक, बंडोपंत सोहोनी, आबासाहेब चव्हाण, माधवराव जोशी, मानाजीराव माने, कृष्णाबाई रामदुर्गकर, शकुंतला जाधव, बानू वसगडेकर
गीते :१) शांतावाया मना या, २) डुलत कशी आनंदे, ३) अशी का हुरहुर लागे, ४) शकुनि साधे कैसा वैर पांडवांचे, ५) प्रेम प्रभावे जगत प्रेम मम, ६) ध्यानी सुरनर सुशांत, ७) धाव झणी दयाघना, ८) वचना कसे दे कृष्ण वाया, ९) इथेची वत्सु दिधले, १०) झणी धाव जननी, ११) सुखवी मना अजी, १२) येई लवलाही बाळा.
कथासूत्र :बलरामाची मुलगी वत्सला ही सुभद्रेचा पुत्र मन्यु यांच्याकडे आकर्षित होते आणि आपला नियोजित वर म्हणून त्याची निवड करते.पण बलराम तिचे काही ऐकत नाही आणि दुर्योधनपुत्र लक्ष्मणाशी तिचा विवाह निश्चित करतो.ऐनवेळी भीमपुत्र घटोत्कच वत्सलेच्या मदतीला धावतो.कृष्ण आणि नारद यांच्याशी संधान बांधून तो आपल्या मायेच्या प्रभावाने तिला पळवून नेतो आणि वत्सला व मन्युचा विवाह लावून देतो.इकडे कौरवांना मात्र आपण मूर्ख बनल्याचा चांगलाच धक्का बसतो.

सामायिक करा :

पार्थकुमार - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती