जगाच्या पाठीवर
१९६०

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/१०९मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी २९६९७/१६-४-१९६०./यू

निर्मिती संस्था :श्रीपाद चित्र
निर्माता :राजा परांजपे
दिग्दर्शक :राजा परांजपे
कथा :राजा परांजपे
पटकथा :ग. दि. माडगूळकर
संवाद :ग. दि. माडगूळकर
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :बाळ बापट
संकलक :बाळ कोरडे
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कला :केशव महाजनी
रंगभूषा :डोंगरे
वेषभूषा :कमरअल्ली
नृत्य दिगदर्शक :बाळासाहेब गोखले, अशोक ताटे, वसंत प्रभू
स्थिरचित्रण :नवरंग सिने आर्ट मुंबई
गीत मुद्रण :शर्मा
रसायन :दत्ता कोटलगी
ध्वनिमुद्रक :मुळगांवकर, पेडणेकर, धीरुभाई
ध्वनिमुद्रिका :एच्.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :रुंगटा सिने कॉर्पोरेशन (प्रा.) लि., मुंबई
कलाकार :राजा परांजपे, सीमा, ग. दि. माडगूळकर, धुमाळ, सौ. माई भिडे, विनय काळे, बालनट राजा, राजा गोसावी, रमेश देव, राजा पटवर्धन, शरद तळवलकर, ग्रामोपाध्ये, दत्ता मायाळू (राजदत्त), सुरेखा जोशी, वसंत ठेंगडी, कुसुम देशपांडे, सुधीर फडके, रेखा
पार्श्वगायक :आशा भोसले, सुधीर फडके
गीते :१) का हो धरिला मजवर राग?, २) एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे, ३) जग हे बंदीशाळा, ४) उद्धवा अजब तुझे सरकार!, ५) धक्का लागला ग मघांशी कुणाचा, ६) नाही खर्चिली कवडी दमडी, ७) नाचनाचुनी अति मी दमले, ८) तुला पाहते रे तुला पाहते
कथासूत्र :सखाराम नोकरीसाठी भटकत होता.भटकत भटकत तो भिकाऱ्यांच्या वस्तीत जातो.इथेच त्याची एका आंधळ्या तरुण मुलीशी गाठ पडते. नाचगाणं करून ती आपलं पोट भरत असते.सखाराम तिला आधार देतो.पण ही मुलगी म्हणजे एका धनिकाची हरवलेली मुलगी असते. तिच्या आईवडिलांना ती सापडते.खूण पटते आणि तिचे आईवडील तिला घेऊन जातात.ती आपल्याबरोबर सखारामला पण घेऊन जाते. सखारामला चांगले दिवस येतात.त्याचा दुर्दैवाचा फेरा संपतो.
विशेष :राजा परांजपेनी मद्रासच्या अ‍े. व्ही. एम्. मधील करार संपवून परतल्यावर ‘जगाच्या पाठीवर’ निर्माण केला.

सामायिक करा :

जगाच्या पाठीवर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती