बापजन्म
२०१७

सामाजिक
१२१ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २५/९/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /१/४४/२०१७, दर्जा - यू

निर्मिती संस्था :सुमतिलाल शाह,सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन
निर्माता :सुमतिलाल शाह
दिग्दर्शक :निपुण धर्माधिकारी
कथा :निपुण धर्माधिकारी
पटकथा :निपुण धर्माधिकारी
संवाद :निपुण धर्माधिकारी
संगीत :गंधार संगोराम
पार्श्वसंगीत :गंधार संगोराम
छायालेखन :अभिजित डी.अब्दे
संकलक :सुचित्रा साठे
गीतलेखन :क्षितीज पटवर्धन
कला :सत्यजित पटवर्धन
रंगभूषा :दिनेश नाईक
वेषभूषा :सायली सोमण
प्रसिद्धी संकल्पना :सचिन सुरेश गुरव
ध्वनि :अक्षय वैद्य
कलाकार :सचिन खेडेकर,पुष्कराज चिरपुटकर,शर्वरी लोहोकरे,सत्यजित पटवर्धन,अकर्श खुराना,श्रीराम पेंडसे,रमेश मेढेकर,सुनील गोडबोले,सुधीर फाटक
पार्श्वगायक :दीप्ती माटे,जयदीप वैद्य
गीते :१)मन शेवंतीचे फूल २)गंध अजूनही
कथासूत्र :भास्कर पंडितांनी आयुष्यभर भारतीय गुप्तचर यंत्रणेमध्ये सिक्रेट एजंट म्हणून काम केलेले.गुप्ततेच्या कारणामुळे त्यांचे कुटुंबाशी बंध तुटलेले असतात.आता निवृत्तीत,पत्नी निवर्तल्यानंतर मुलगा परदेशी आणि मुलगी दुसऱ्या शहरात सासरी. आता त्यांना आपल्या मुलाबाळांची आठवण तीव्रतेने होऊ लागते. मुलांच्या मनात आपल्याविषयी तिरस्कार आहे हे माहित असूनही त्यांनी आपल्याला घरी येऊन भेटावे असे सतत त्यांना वाटते.मग त्यासाठी ते एक वेगळीच युक्ती लढवतात........

सामायिक करा :

अधिक माहिती