चित्र-चरित्र

सुलेखा तळवलकर
सुलेखा तळवलकर
अभिनेत्री
८ ऑक्टोबर

सुलेखा तळवलकर यांचे शिक्षण मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये झाले. ‘सातच्या आत घरात’ हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक. २००४ मध्ये याच नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ या मालिकेद्वारे सुलेखानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘आई’ चित्रपटामध्ये सुलेखानं शेफाली जाधवची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘तुझ्या माझ्यात’, ‘तिन्हीसांजा’, ‘श्यामचे वडील’, ‘कॅनव्हास’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘कदाचित’ हे तिचे महत्त्वाचे चित्रपट. ‘जावईशोध’, ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’, ‘श्रावणसरी’, ‘अवंतिका’, ‘कन्यादान’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या तिच्या उल्लेखनीय मालिका आहेत.

'धुरळा', 'टेक केअर गुड नाईट' हे सुलेखाचे अलीकडचे चित्रपट तर 'माझा होशील ना' आणि 'सांग तू आहेस ना' या मालिका आहेत.

मंदार जोशी



चित्र-चरित्र