चित्र-चरित्र

अदिती सारंगधर
अदिती सारंगधर
अभिनेत्री
१६ ऑक्टोबर १९८१

अदितीचा जन्म कल्याणचा. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये तिनं शिक्षण घेतलं. कल्याणमध्ये असताना निशीकांत कामतच्या ‘लिटमस’ या प्रायोगिक नाटकामध्ये तिनं काम केलं. हे काम निर्मात्या कांचन अधिकारी यांच्या पसंतीस उतरलं आणि त्यांनी तिला ‘दामिनी’ मालिकेसाठी निवडलं. ही मालिका खूप गाजली नि अदितीची मनोरंजन क्षेत्रामधील कारकीर्द सुरू झाली. ‘अकल्पित’, ‘दिवसेंदिवस’, ‘नाथा पुरे आता’, ‘उलाढाल’, ‘चिंगी’, ‘ती रात्र’, ‘काय करू नि कसं करू’, ‘मोहर’, ‘नवरा माझा भवरा’ हे तिचे उल्लेखनीय चित्रपट. ‘वादळवाट’, ‘लक्ष्य’ या दोन मालिकांमधील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘ऑल दि बेस्ट’, ‘प्रपोजल’, ‘ग्रेसफुल’ या नाटकांद्वारे तिने रंगभूमीवरही उत्तम काम केले आहे.
- मंदार जोशी



चित्र-चरित्र