चित्र-चरित्र

प्रिया मराठे
प्रिया मराठे
अभिनेत्री
२३ एप्रिल १९८७

मालिका आणि चित्रपट यामधील सध्याचा चर्चेतला चेहरा म्हणजे प्रिया मराठे. कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रियाने बऱ्याच मराठी तसेच हिंदी मालिकांमधून अभिनय केला. ‘या सुखांनो या’ मालिकेद्वारे तिने ग्लॅमर जगतामध्ये पदार्पण केले. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘संभाजी’ या तिच्या गाजलेल्या मालिका. ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरण’, ‘कसम से’ या हिंदी मालिकांमुळे तिची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’, ‘१२३४’, ‘विघ्नहर्ता महागणपती’ या मराठी चित्रपटांमध्येही ती झळकली.

२०२३ मधील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमधील प्रियाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र