चित्र-चरित्र

पल्लवी जोशी
पल्लवी जोशी
अभिनेत्री
४ एप्रिल १९६९

हिंदी-मराठी चित्रपट, टीव्ही मालिका गाजवणारी अष्टपैली अभिनेत्री म्हणजे पल्लवी जोशी. लहान वयात त्यांनी रंगमंचावर काम करणं सुरू केलं. बाल कलाकार म्हणून ‘बदला’ आणि ‘आदमी सडक का’ नावाच्या दोन चित्रपटांत अभिनय केला होता. १९७९ साली आलेल्या ‘दादा’ ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही समांतर धारेच्या चित्रपटांमध्ये कामं केली. त्यामध्ये ‘सूरज का सातवा घोडा’, ‘तृषाग्नी’, ‘वंचित’ आणि ‘रिहाई’ हे प्रमुख चित्रपट होते. व्यावसायिक मोठ्या बजेटच्या चित्रपटात त्यांनी बहिण किंवा नायिकेच्या मैत्रिणीच्या भूमिका केल्या. ‘सौदागर’, ‘पनाह’, ‘तहलका’ आणि ‘मुजरीम’ हे ते चित्रपट. ‘सारेगम’ या मराठी कार्यक्रमामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. ‘रीटा’ आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट.

'द ताश्कंद फाइल्स' या २०१९ मधील चित्रपटासाठी पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०२२ मधील पल्लवीच्या 'दी काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने मोठे यश मिळवले.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र