चित्र-चरित्र

श्रुती मराठे
श्रुती मराठे
अभिनेत्री
९ ऑक्टोबर १९८६

श्रुतीचा जन्म बडोद्याचा. शालेय तसेच कॉलेजचं शिक्षण पुण्यात झालं. लहानपणी तिला अभिनयाऐवजी खेळात विशेष रस होता. मात्र दहावीत असतानाच तिला स्मिता तळवलकर यांच्या ‘पेशवाई’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिला एकापाठोपाठ एक अशा नवनवीन संधी मिळत गेल्या. श्रेयस तळपदेची निर्मिती असलेला ‘सनई चौघडे’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘प्रेमसूत्र’, ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘लागली पैज’, ‘असा मी तसा मी’, ‘तप्तपदी’ हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट. ‘लग्नबंबाळ’, ‘क्लीनबोल्ड’ या नाटकांमध्येही तिनं काम केलं आहे. श्रुतीनं मराठीबरोबरच तमीळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिथं ती श्रुती प्रकाश या नावानं ओळखली जाते.

श्रुतीची रुपेरी पडद्यावरील मालिका गाजल्यानंतर एका दाक्षिणात्य चित्रपटातील तिचा बिकिनीचा फोटो व्हायरल झाला होता. लोकांनी या फोटोवरून श्रुतीला मोठ्या प्रमाणत ट्रोल केलं होतं. तिने 'बुधिया सिंग बॉर्न टू रन' या चित्रपटाद्वारे बॉलिवुड मध्ये प्रवेश केला. 'बॉर्न टू रन' मध्ये श्रृती अभिनेता मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. ‘लग्नबंबाळ’, ‘क्लीनबोल्ड’ या नाटकांमध्येही तिनं काम केलं आहे. ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केलं आहे. तसेच श्रृतीने नेटफ्लिक्स वरील ‘बार्ड ऑफ ब्लड’या वेब सिरीजमध्येही मी काम केलं आहे. २०१३ साली “तुझी माझी लव्ह स्टोरी” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रुतीला गौरव घाणेकर यांच्याशी प्रेम जुळलं आणि ६ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी लग्न केलं. सध्या दोघेही मुंबईत स्थायिक आहेत. २०१४ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी एकत्र येऊन 'कलावंत ढोल ताशा पथक' सुरू केलं. श्रुती त्या पथकाची एक सदस्य आहे. तिला ढोलवादनाची आवड असून दरवर्षी पुण्याच्या गणपती मिरवणुकांमध्ये ती वादन करताना दिसते. ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘प्रेमसूत्र’, ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘लागली पैज’, ‘असा मी तसा मी’, ‘तप्तपदी’ हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट.

-संजीव वेलणकर



चित्र-चरित्र