चित्र-चरित्र

मनवा नाईक
मनवा नाईक
अभिनेत्री-दिग्दर्शिका
८ सप्टेंबर १९८३

मराठी-हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधील आश्वासक चेहरा म्हणजे मनवा नाईक. मनवानं आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘स्टार वन’ वाहिनीवरील ‘स्पेशल स्क्वॉड’ या मालिकेपासून केली. यानंतर तिने ‘बा बहू और बेबी’, ‘तीन बहुरानियॉं’ या हिंदी मालिकादेखील केल्या. ‘क्षणभर विश्रांती’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘शासन’, ‘पिंडदान’, ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’, ‘काकस्पर्श’ हे तिचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘पोरबाजार’ या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शिका बनली. ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेत तिनं अभिनय केला होता. तसेच ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेची निर्मितीदेखील केली होती. ‘जोधा अकबर’ या हिंदी चित्रपटातही तिनं अभिनय केला होता.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र