चित्र-चरित्र

मिलिंद सोमण
मिलिंद सोमण
अभिनेता
४ नोव्हेंबर १९६४

मिलिंद सोमण यांचा जन्म स्कॉटलंडचा. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत तो तिथंच राहिला. त्यानंतर त्याचं कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झालं. भायखळ्याच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये मिलिंदनं पदविका घेतली. मात्र त्यानंतर या क्षेत्रात कार्यरत होण्याऐवजी त्यानं मॉडेलिंगचा रस्ता पकडला. ‌‘टफ’ या शूजच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘कॅप्टन व्ह्योम’ ही त्याची पहिली गाजलेली हिंदी मालिका. ‘भेजा फ्राय’, ‘जुर्म’, ‘अग्निवर्षा’, ‘१६ डिसेंबर’, ‘रुल्स- प्यार का सुपरहिट फॉर्म्युला’, ‘बाजीराव मस्तानी’ हे त्याचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट. ‘गंध’, ‘संहिता’, ‘नागरीक’ या मराठी अभिनयामधील त्याच्या कामगिरीचं कौतुक झालं.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र