चित्र-चरित्र

राजेश शृंगारपुरे
राजेश शृंगारपुरे
अभिनेता
२९ ऑक्टोबर १९७७

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांमधील अष्टपैलू कलाकार म्हणजे राजेश शृंगारपुरे. राजेशचा जन्म मुंबईतला. इथंच त्याचं बालपण गेलं. लहानपणापासून त्याला हवाई दलामध्ये पायलट बनायचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं भरपूर तयारीदेखील केली होती. परंतु, काही किरकोळ कारणांमुळे त्याची ही संधी हुकली. त्यानंतर मग तो अभिनय क्षेत्राकडे वळला. ‌१९९५ मधील ‘परमवीर चक्र’ हा त्याचा पहिला चित्रपट. यानंतर त्यानं मराठी-हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये भरपूर कामं केली. ‘सरकार राज’, ‘मर्डर ३’, ‘डॅडी’ हे त्याचे गाजलेले हिंदी चित्रपट. ‘स्वराज्य’, ‘शॉर्टकट’, ‘मॅटर’, ‘मन्या द वंडर बॉय’, ‘गोट्या’ हे त्याचे उल्लेखनीय चित्रपट. ‘शंभू माझा नवसाचा’ या चित्रपटामध्ये त्यानं तब्बल १२ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. ‘सारथी’, ‘साहिब बिवी और गुलाम’, ‘चार दिवस सासूचे’, ‘सप्तपदी’ या मालिकांमधूनही तो झळकला. २०१८ मध्ये ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील मराठी ‘बिग बॉस’मधूनही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र