चित्र-चरित्र

सुचित्रा बांदेकर
सुचित्रा बांदेकर
अभिनेत्री
१० ऑक्टोबर १९७२

सुचित्रा बांदेकर यांचा जन्म नाशिकचा. त्यांचं बालपणही याच शहरात गेलं. त्यानंतर शालेय शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या. दादर येथील बालमोहन विद्यामंदिरामधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयामधून त्या पदवीधर झाल्या. मराठी चित्रपट, हिंदी मालिका-चित्रपट असा त्यांचा प्रवास राहिला आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘रमा माधव’, ‘इश्कवाला लव्ह’, ‘रणांगण’, ‘मला आई व्हायचंय’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘सिंघम’, ‘धमाल’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. ‘घर की लक्ष्मी बेटियॉं’, ‘दो हंसोंका जोडा’, ‘प्यार का दर्द है’, ‘हम पॉंच’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. ‘लक्ष्य’, ‘ललित २०५’ या मराठी मालिकांची निर्मितीही त्यांनी केली आहे.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र