उषा जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या नोकरीसाठी पुण्यात आल्या. येथे आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी काही जाहिरातींमध्ये काम केलं. ‘ट्रॅफिक सिग्नल’ (२०१७) या चित्रपटाद्वारे त्यांना कलाक्षेत्रामधील पहिला ‘ब्रेक’ मिळाला. ‘स्ट्रायकर’, ‘गाली’, ‘भूतनाथ रीटर्न्स’, ‘वीरप्पन’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. ‘धग’ या मराठी चित्रपटामधील कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
-मंदार जोशी