चित्र-चरित्र

समीर चौघुले
समीर चौघुले
अभिनेता
२९ जून १९७३

अभिनेता समीर चौघुले यांची जडणघडण मुंबईत झाली. कॉमर्स पदवीधर असलेल्या चौघुले यांनीआजवर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशी तीनही क्षेत्रे गाजवली आहे. आधी खेळाची आवड असणाऱ्या चौघुले यांनी कालांतराने कला क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द घडविली. ‘काय द्याचं बोला’, ‘मुंबई मेरी जान’, ‘आजचा दिवस माझा’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. ‘असा मी असा मी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ या मराठी नाटकांमधील त्यांचे कामदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. भरत दाभोळकर यांच्या ‘कॅरी ऑन हेवन्स’ या हिंग्लिश नाटकात ते झळकले होते. ‘बेस्ट ऑफ बॉटम्स अप’ या इंग्रजी नाटकातील त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी उचलून धरली. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘टिकल टू पोलिटिकल’, ‘आंबट गोड’, ‘कुंकू’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील त्यांची कामगिरी रसिकांनी डोक्यावर घेतली आहे. २०२१ मध्ये 'राम नगरकर कलागौरव' पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

मंदार जोशी



चित्र-चरित्र