चित्र-चरित्र

उमेश कामत
उमेश कामत
अभिनेता
१२ डिसेंबर १९७९

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामतने ओळख मिळवली आहे. "कायद्याचं बोला" या चित्रपटातून त्याने २००६ साली आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरू केली. प्रिया बापट आणि उमेश हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला. व उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले.

‘समर - एक संघर्ष’, ‘पटलं तर घ्या’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘मणि मंगळसूत्र’, ‘थोडी खट्टी थोडी हट्टी’, ‘धागे दोरे’, ‘परीस’, ‘टाइम प्लीज’, ‘माय डिअर यश’, ‘लग्न पाहावे करून’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘बाळकडू’, ‘अ पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाइम’ हे त्याचे महत्त्वाचे चित्रपट. ‘स्वामी’, ‘रणांगण’, ‘गांधी आडवा येतो’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’ यासारख्या अनेक नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. त्याच्या विषयी अधिक माहिती करीता तुम्ही www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

‘धुरळा’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘ये रे ये रे पैसा’ हे उमेशचे अलीकडचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. २०२१ मध्ये उमेशची प्रमुख भूमिका असलेल्या 'अजूनही बरसात आहे' ह्या मालिकेला मोठे यश मिळाले.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र