चित्र-चरित्र

संजय खापरे
संजय खापरे
अभिनेता
३१ मे

संजय खापरे यांचे बालपण गेले ते मुंबईत. परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याखेरीज शालेय स्तरावर अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. येथेच त्यांची संतोष पवार, अंकुश चौधरी, भरत जाधव, केदार शिंदे यांच्याशी ओळख झाली. संजय बेलोसे हे त्यांचे गुरु. ‘यदा कदाचित’ या नाटकामुळे खापरे यांना लोकप्रियता मिळाली. ‘प्रियतमा’, ‘दगडी चाळ’, ‘रॉकी हॅंडसम’, ‘झाला बोभाटा’, ‘तलाव’, ‘लई भारी’, ‘फॅमिली कट्टा’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट.

'मेनका ऊर्वशी', 'प्रेमाचा राडा', 'झांगडगुत्ता', 'भाई व्यक्ती की वल्ली-२', 'विठ्ठला शपथ', 'एक मराठा लाख मराठा' हे त्यांचे अलीकडचे काही महत्त्वाचे चित्रपट. 'लक डाउन', 'दे धक्का 2' हे खापरे यांचे २०२२ मधील उल्लेखनीय चित्रपट.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र