चित्र-चरित्र

विघ्नेश जोशी
विघ्नेश जोशी
अभिनेता
८ जुलै

विघ्नेश जोशी हे नाव नाटक-मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील सतीश दुसाने या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना ठाऊक आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेमध्ये त्यांनी काम केले आहे. मुख्यत्वे साहाय्यक भूमिकांमधून त्याच्या अभिनयाची झलक, प्रसन्नपणा याची ओळख प्रेक्षकांना असते. अभिनयाबरोबरच निरनिराळ्या कार्यक्रमांची संकल्पना ठरविणे, आखणी करून कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये कार्यरत विघ्नेश उत्तम हार्मोनियम वादन करतात. मालिकांमधील छोट्या छोट्या भूमिकांबरोबरच ‘वाऱ्यावरची वरात’, ‘कॅरी ऑन काका’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केली आहे. त्यांचा मानवंदना हा" राम गणेश गडकरी , कुसुमाग्रज , विद्याधर गोखले, अत्रे, पुलं यांच्या सारख्यांच्या साहित्य नाट्य संगीत काव्य आणि आठवणी यावर आधारित एक दर्जेदार कार्यक्रम आहे. ‘हसत खेळत’ हा कवितांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम विघ्नेश, त्याची पत्नी, मुलगा तसेच विजय गोखले, प्रदीप पटवर्धन यांच्या साथीने ते सादर करतात. ‘आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमाद्वारे लोकांपर्यंत महत्त्वाच्या कवींच्या कविता पोहोचविण्याचे काम विघ्नेश जोशी यांनी केले आहे. ‘एक अलबेल’ या चित्रपटामध्ये त्यांनी संगीतकार सी. रामचंद्र यांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘सुंदर माझं घर’, ‘दाह’, ‘मन्या द वंडर बॉय’, ‘गुलाम बेगम बादशाह’ हे त्यांचे इतर काही मराठी चित्रपट.
- मंदार जोशी



चित्र-चरित्र