चित्र-चरित्र

मकरंद देशपांडे
मकरंद देशपांडे
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक
६ मार्च १९६६

डोक्यावर भरपूर वाढलेले अस्ताव्यस्त केस, शिडशिडीत अंगकाटी असलेला मकरंद देशपांडे म्हणजे अभिनयाचा बंदा रुपया. ‘दगडी चाळ’ आणि ‘स्वदेश’, ‘सत्या’ ‘कयामत से कयामत तक’ या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेते मकरंद देशपांडे यांचे दिग्दर्शन हे वेगळे असते. त्याचसोबत लूक, व हेअर स्टाईल यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख आहे. मकरंद देशपांडे याच्या भूमिका असलेले चित्रपट ‘रिस्क’, ‘डरना जरूरी है’, ‘हनन’, ‘एक से बढकर एक’, ‘स्वदेश’, ‘चमेली’, ‘विस्फोट’, ‘मकडी’, ‘लाल सलाम’, ‘रोड’, ‘प्यार दिवाना होता है’, ‘जंगल’, ‘घात’, ‘सरफरोश’, ‘सत्या’, ‘उडान’, ‘नाजायज’, ‘अंत’, ‘तडीपार’, ‘पहला नशा’, ‘सर’ इत्यादी. त्यांचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटात नुकताच येवून गेला. यात त्यांनी साकारलेली अरूण गवळीशी साधर्म्य दाखवणारी भूमिका चांगलीच गाजली आहे. त्यातला ‘चुकीला माफी नाही’, हा डायलॉग तर फारच प्रसिद्ध झाला आहे. आत्ता पर्यत ४० चित्रपट व नाटके त्यांनी केली आहेत. त्यांनी ५ पेक्षा अधिक चित्रपटासाठी दिग्दर्शक केले आहे. मकरंद देशपांडे यांनी कन्नड चित्रपटातही काम केले आहे. 'दंडूपाल्या' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्यांची खलनायकाची भूमिका आहे. मकरंद देशपांडे यांनी अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांची अंश नावाची थिएटर कंपनी आहे. ‘एक रात्र मंतरलेली’, ‘समांतर’, ‘रिटा’, ‘अनुदिनी’, ‘सॅटर्डे संडे’, ‘पन्हाळा’ हे मकरंदचे उल्लेखनीय मराठी चित्रपट.

'दगडी चाळ २', 'आठवा रंग प्रेमाचा' हे मकरंद देशपांडे यांचे २०२२ मधील उल्लेखनीय चित्रपट.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र