चित्र-चरित्र

पल्लवी सुभाष
पल्लवी सुभाष
९ जून १९८४

बीकॉमपर्यंत शिकलेल्या पल्लवीचा प्रवास मॉडेलिंग ते अभिनय असा झाला आहे. तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि श्रीलंकन चित्रपटात काम करणारी ती एकमेव मराठी अभिनेत्री आहे. बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर ‘तुम्हारी दिशा’ या मालिकेद्वारे ती पहिल्यांदा टीव्ही मालिकेत झळकली. मात्र पल्लवीला मोठी लोकप्रियता मिळवून दिली ती एकता कपूरच्या ‘करम अपना अपना’ या मालिकेने. या मालिकेमधील तिची ‘गौरी’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर तिने ‘चार दिवस सासूचे’, ‘अधुरी एक कहाणी’ या मराठी मालिका केल्या. २००६ साली ‘कुंकू झाले वैरी’ या चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘आयला रे’, ‘असा मी तशी तू’, ‘प्रेमसूत्र’, ‘धावा धावा खून खून’, ‘पोलिसाची बायको’, ‘हॅपी जर्नी’ हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट.
मंदार जोशी



चित्र-चरित्र