चित्र-चरित्र

मंगेश देसाई
मंगेश देसाई
अभिनेता
२८ जून १९७२

मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात काम करणारा आघाडीचा अभिनेता म्हणजे मंगेश देसाई. मंगेशचा जन्म औरंगाबादचा. एसबी हायस्कूलमध्ये शिक्षण झालेल्या मंगेशने औरंगाबाद येथील महाविद्यालयाच्या नाट्य कला विभागात पुढील शिक्षण घेतले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ मालिकेनं त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ‘दिवसेंदिवस’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘खेळ मांडला’, ‘विठ्ठला शपथ’, ‘लॉस्ट अॅंड फाउंड’, ‘निळकंठ मास्तर’, ‘बायोस्कोप’, ‘एक तारा’, ‘तू आणि मी’, ‘हुप्पा हुय्या’, ‘बापू बिरू वाटेगांवकर’, ‘निशाणी डावा अंगठा’, बाबा लगीन’ आदी चित्रपट त्याने केले. विख्यात अभिनेते भगवानदादा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘एक अलबेला’ या चित्रपटातील भगवानदादांच्या व्यक्तिरेखेत मंगेशने दाखवलेली चुणूक रसिकांच्या पसंतीस उतरली.

‘अवंतिका’, ‘ऊन पाऊस’, ‘सांजसावल्या’ आदी मालिकांमध्येही त्याचा सहभाग होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला मंगेशने केलेली ‘जाऊ बाई जोरात’ नाटकातील धमाल प्रेक्षकवर्ग अजूनही विसरू शकलेले नाहीत.

२०२२ मध्ये मंगेश देसाई यांनी 'धर्मवीर' चित्रपटाची निर्मिती केली होती.

मंदार जोशी



चित्र-चरित्र