मराठी नाटक, मालिका आणि रंगभूमीवर वेगळ्या पद्धतीचं काम करणारी अभिनेत्री म्हणजे दीपा परब. दीपाचा जन्म मुंबईचा. परळ येथील दयानंद कॉलेजमधून तिनं पदवी घेतली. तत्पूर्वी आठवीत असल्यापासूनच तिला अभिनयाची गोडी लागली होती. ‘थोडी खुशी थोडी गम’, ‘छोटी मा’ या तिच्या हिंदी मालिका लोकप्रिय ठरल्या. ‘नटरंग’, ‘मुलगा’, ‘कथा तिच्या लग्नाची’, ‘क्षण’, ‘चकवा’, ‘मराठा बटालियन’ हे तिचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘ऑल दि बेस्ट’, ‘बॉम्बे मेरी जान’ या नाटकांमध्येही ती झळकली आहे.
-मंदार जोशी