चित्र-चरित्र

सचित पाटील
सचित पाटील
अभिनेता,दिग्दर्शक,लेखक
२७ सप्टेंबर १९७९

मराठी सृष्टीत एक उभारता अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सचित पाटील याने आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. सचित पाटीलने रुपारेल कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कौन या बॉलिवूड सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सब कुछ है कुछ भी नहीं, रास्ता रोको या चित्रपटानंतर त्याने मराठी चित्रपट सृष्टीकडे आपले पाऊल वळवले. अंकुश चौधरी सोबत ‘साडे माडे तीन ‘ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले. या यशानंतर त्याने अवधूत गुप्तेचा झेंडा हा आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. क्षणभर विश्रांती, अर्जुन, क्लासमेट्स, समुद्र, विठ्ठल या चित्रपटासोबतच त्याने छोट्या पडद्यावरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या गाजलेल्या मालिकेतून दुहेरी भूमिका बजावली. या मालिकेनंतर सचित पाटीलने रंगभूमीवर पुनःपदार्पण करत “महारथी” हे नाटक साकारले. सचित पाटीलने आपली कॉलेजची मैत्रीण “शिल्पा पै” हिच्यासोबत लग्नाची गाठ बांधली. आज १९ डिसेंम्बर रोजी म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिनी सचितने आपल्या लग्नाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अपवधीतच त्याच्या या फोटोला अवधूत गुप्तेसह अनेक कलाकारांनी त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. सचितची पत्नी शिल्पा पै-पाटील ही एक प्रसिद्ध गायिका आहे. ई टीव्ही वरील “पाऊसवेळा” या कार्यक्रमात तिने आपल्या गायकीची झलक दाखवून दिली होती. यासोबतच तिने असा मी अशी ती , क्षणभर विश्रांती या चित्रपटातील गाणी गायली आहेत. काही भोजपुरी चित्रपट गाणी आणि भक्तीगीते देखील तिने गायली आहेत. मिलिंद गुणाजी यांच्या कवितांवर आधारित ‘मन पाखराचे होई’ या अल्बमची गाणी देखील शिल्पाने गायली आहेत.

-संजीव_वेलणकर



चित्र-चरित्र