चित्र-चरित्र

श्रेयस तळपदे
श्रेयस तळपदे
अभिनेता
२७ जानेवारी १९७६

नागेश कुकुनूर यांना मुक्यास आणि बहिऱ्या अशा इक्बारल या क्रिकेटची आवड असणाऱ्या तरुण मुलाच्या भूमिकेसाठी कलाकाराची आवश्य्कता होती. इक्बा्लची भूमिका करण्याची संधी श्रेयस मिळाली आणि हा चित्रपट श्रेयसच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर ‘गोलमाल’ मालिकेमधल्या भूमिकेमुळं आपण विनोदी भूमिकाही चांगल्या करू शकतो हे श्रेयसनं सिद्ध केलं. हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी श्रेयसनं रंगभूमीवर आणि दूरचित्रवाहिन्यांवर बरंच काम केलं. ‘ऑल द बेस्ट’, ‘टूरटूर’, ‘अश्रूंची झाली फुले’ अशा काही नाटकांमध्ये श्रेयसनं कामं केली. ‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘बेधुंद मनाच्या लहरी’ अशा मालिका केल्या. त्याने ‘आभाळमाया’ नंतर ‘दामिनी’, ‘अवंतिका’ अशा काही मालिका केल्या. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर ‘पिंपळपान’ मालिकेतल्या एका भागासाठी श्रेयसने काम केलं होतं. त्यानंतर ‘पछाडलेला’, ‘सावरखेड एक गाव’, ‘बाजी’ आदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. पुढं तो हिंदी चित्रपटसृष्टीकडं वळला. हिंदीमध्ये ‘इक्बाल’, ‘डोर’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘हाऊसफुल’ , ‘वेलकम टू सज्जनपूर’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं. श्रेयसनं ‘सनई चौघडे’ आणि ‘पोस्टर बॉईज’ या दोन यशस्वी मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

'पोस्टर बॉईजच्या यशानंतर श्रेयसने ह्या चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक केला. सध्या तो भारतीय रंगभूमीसाठी एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित करीत आहे. श्रेयसने २०२१ मध्ये 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका केली. तसेच 'पुष्पा' ह्या तेलगू चित्रपटासाठी त्याने अल्लू अर्जुनसाठी हिंदी संवाद डब केले. श्रेयसने २०२२ मध्ये 'आपडी थापडी' हा मराठी चित्रपट तर 'कौन प्रवीण तांबे' हा हिंदी चित्रपट केला .

- मंदार जोशी



चित्र-चरित्र