चित्र-चरित्र

आनंद इंगळे
आनंद इंगळे
अभिनेता
१२ नोव्हेंबर

मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिका अशा तीनही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे आनंद इंगळे. आनंदचा जन्म पुण्याचा. तिथेच त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. १९९९ मधील ‘प्रपंच’ मालिकेपासून त्याचा अभिनयप्रवास सुरू झाला. परंतु त्याला लोकप्रियता मिळाली ती २०१० मधील ‘अजब प्रेमाची गजब गोष्ट’ या चित्रपटामुळे. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘गोट्या’, ‘रणांगण’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘एफ यू’, ‘आंधरी कोशिंबीर’, ‘फुगे’, ‘बालक पालक’ हे त्याचे महत्त्वाचे चित्रपट. ‘बॅंजो’ आणि ‘रज्जो’ हे दोन हिंदी चित्रपटही त्यानं केले. ‘माकडाच्या हाती शॅमपेन’, ‘९ कोटी ५७ लाख’, ‘अ फेअर डिल’, ‘लग्नबंबाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘वाऱ्यावरची वरात’ ही त्याची उल्लेखनीय नाटकं. ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘फू बाई फू’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘कुंकू’ या मालिकांमधील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.

'मोगरा फुलला', 'ये रे ये रे पैसा २', 'रंपाट' हे त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे चित्रपट. 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र