गेल्या अडीच दशकांपासून मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र नायकांच्या व्यक्तिरेखांवर आपला ठसा उमटविणारा अभिनेता म्हणजे गणेश यादव. अलीकडच्या काळात गणेश यादव यांच्या वाट्याला पोलिस दलातील भूमिका आल्या असल्या तरी त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मम्मो’ या हिंदी चित्रपटापासून त्यांच्या रुपेरी कारकीर्दीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘वास्तव’, ‘कुरुक्षेत्र’, ‘कलकत्ता मेल’, ‘ब्लफमास्टर’, ‘फूंक २’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘द अटॅक्स ऑफ २६-११’ यासारखे महत्त्वाचे हिंदी चित्रपट केले. ‘कायद्याचं बोला’, ‘बनगरवाडी’, ‘मोरया’, ‘लालबाग परळ’, ‘मी सिंधूताई सकपाळ’, ‘दुभंग’, ‘आयना का बायना’, ‘एक हजाराची नोट’, ‘गणवेश’, ‘शिनमा’ या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
मंदार जोशी