चित्र-चरित्र

सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री
१८ मे १९८८

सोनाली कुलकर्णी यांचा जन्म खडकी-पुणे येथे झाला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलात डॉक्टर म्हणून सेवेस होते. सोनालीच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण तिने केंद्रीय विद्यालयालयातून घेतले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून तिने पत्रकारिता हा विषय घेत पदवी मिळवली. पुण्यातीलच ‘इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट’मधून तिनं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘गाढवाचं लग्न’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ हे तिचे सुरुवातीचे चित्रपट. ‘नटरंग’ ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीमुळे तिला खरी ओळख मिळाली. ‘क्षणभर विश्रांती’, ‘अजिंठा’, ‘झपाटलेला २’, ‘मितवा’, ‘समुद्र’, ‘इरादा पक्का’, ‘क्लासमेटस’, ‌‘शटर’, ‘बघतोस काय मुजरा कर’ हे तिचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘ग्रँड मस्ती’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. अजय देवगणच्या ‘सिंघम २’ ह्या चित्रपटात सोनाली पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

हंपी (२०१७), ती आणि ती (२०१९), हिरकणी (२०१९), विक्की वेलिंगकर (२०१९), धुरळा (२०१०) हे सोनालीचे अलीकडचे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत. 'हिरकणी' चित्रपटातील अभिनयासाठी तिला काही पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

'पांडू' आणि 'झिम्मा' हे सोनालीचे अलीकडचे दोन यशस्वी चित्रपट.

--मंदार जोशी



चित्र-चरित्र