चित्र-चरित्र

राहुल सोलापूरकर
राहुल सोलापूरकर
अभिनेता
१७ ऑक्टोबर

मराठी चित्रपट, टीव्ही मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारे कलावंत म्हणजे राहुल सोलापूरकर. महेश कोठारे दिग्दर्शित ‘थरथराट’ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे सोलापूरकर यांना अपार लोकप्रियता मिळाली. ‘वज्र’, ‘नीळकंठ मास्तर’, ‘माहेरची माया’, ‘रावसाहेब’, ‘प्रतिकार’, ‘धुमाकूळ’, ‘अफलातून’, ‘नशीबवान’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘बालगंधर्व’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. दादा कोंडके यांच्या ‘येऊ का घरात’ आणि ‘पळवापळवी’ या दोन चित्रपटांमध्येही सोलापूरकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांवरील मालिकाही त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे गाजवली होती. उत्कृष्ट मुलाखतकार म्हणूनही त्यांनी अलीकडच्या काळात नाव मिळवले आहे.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र