चित्र-चरित्र

मोहन गोखले
मोहन गोखले
अभिनेता
७ नोव्हेंबर १९५३ --- २९ एप्रिल १९९९

मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका, हिंदी चित्रपट-मालिका गाजविणारे एक चतुरस्त्र नाव म्हणजे मोहन गोखले. रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये ते लीलया वावरले. मराठी वाहिन्यांच्या विश्वातील अगदी सुरुवातीच्या ‘श्वेतांबरा’ मालिकेत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांनी ‘भारत एक खोज’, ‘मि. योगी’ यासारख्या दर्जेदार मालिकांमध्ये अभिनय केला. ‘माफीचा साक्षीदार’, ‘बन्या बापू’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘ठकास महाठक’, ‘हेच माझे माहेर’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. अमोल पालेकर दिग्दर्शित ‘कैरी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. ‘होली’, ‘मिर्च मसाला’, ‘हीरो हीरालाल’ हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट. मोहन गोखले यांनी रंगभूमीही गाजवली. ‘महापूर’, ‘मिकी आणि मेमसाब’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘गिधाडे’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ ही त्यांची विशेष उल्लेखनीय नाटके. १९९९ मध्ये त्यांचे ‘हे राम’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यांचे अकाली निधन झाले.



चित्र-चरित्र