चित्र-चरित्र

शिवाजी साटम
शिवाजी साटम
अभिनेते
२१ एप्रिल १९५०

मराठी-हिंदी चित्रपट तसेच छोटा पडदा गाजविणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवाजी साटम. १९७५ सालच्या रॉबिनहूड या बालनाट्यापासून त्यांच्या कारकीर्दीस प्रारंभ झाले. १९८७ मधील ‘पेस्तनजी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘उत्तरायण’, ‘हापूस’, ‘आई’, ‘दे धक्का’, ‘ध्यानीमनी’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘कुरुक्षेत्र’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायनागेट’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘टॅक्सी नं. 9211’, ‘चायना गेट’, ‘वास्तव’, ‘सूर्यवंशम’ या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामाचं कौतुक झालं. साटम यांनी छोट्या पडद्यावरही उल्लेखनीय काम केलं आहे. ‘एक शून्य शून्य’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘रिश्ते नाते’, ‘सीआय़डी’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. ‘सीआयडी’ मालिकेनं तर लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘एक होती वादी’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 'मी शिवाजी पार्क', 'वेडिंगचा शिनेमा' हे त्यांचे अलीकडचे चित्रपट.

२०२२ मध्ये शिवाजी साटम यांचा 'दे धक्का २' आणि २०२३ मध्ये 'बांबू' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र