चित्र-चरित्र

वैशाली भैसने-माडे
वैशाली भैसने-माडे
पार्श्वगायिका
२१ ऑगस्ट १९८४

सध्याच्या नवीन पिढीचा दमदार आवाज म्हणजे वैशाली माहे. वैशाली मूळची वर्ध्याजवळच्या हिंगणघाटची. २००८च्या ‘सारेगमप’ स्पर्धेमुळे तिचा आवाज घराघरात पोचला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकाविल्यानंतर तिनं पुढच्याच वर्षी झालेल्या ‘सारेगमप चॅलेंजर’ हा हिंदी कार्यक्रमामध्येही बाजी मारली. या विजेतेपदामुळे ती राष्ट्रीय पातळीवर सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली. २०११ मधील ‘दमादम’ या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपट पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी तिने श्रेया घोषालबरोबर गायलेल्या ‘पिंगा’ या गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘नवरा माझा भवरा’, ‘वाघी’, ‘खरं सांगू खोटं खोटं’, ‘हंटर’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘जुगाड’, ‘लालबागची राणी’, ‘गर्भ’ या मराठी चित्रपटांसाठीही तिने पार्श्वगायन केले आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांची शीर्षक गीते तिने गायली आहेत.

करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' चित्रपटासाठी वैशालीने पार्श्वगायन केले होते.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र