चित्र-चरित्र

रितेश देशमुख
रितेश देशमुख
अभिनेता
१७ डिसेंबर १९७८

बॉलिवुडमध्ये वेगळी उंची गाठल्यानंतर मराठमोठ्या रितेशने मराठी चित्रपटसृष्टीकडे वळून ‘लय भारी’ पदार्पण केले. चित्रपटात ‘अँग्री यंग मॅन’ लूकसोबत या चित्रपटाला रितेशने दुहेरी भूमिकेची किनार दिली आणि चाहत्यांना ‘लय भारी’ ट्रीट दिली. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडीस काढले. रितेश देशमुख यांनी ‘मस्ती’, ‘हाऊसफुल’, ‘क्या कूल है हम’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘धमाल’ यासारखे हिंदी सिनेमे दिले. मात्र काही सिनेमांनी रितेश देशमुखला प्रोफेशनल आयुष्याबरोबरच पर्सनल आयुष्यात देखील खास मदत केली. रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटाला ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले. रितेशची निर्मिती असलेल्या ‘फास्टर फेणे’ असलेल्या अलीकडच्या चित्रपटानं मोठं यश मिळवलं. यापूर्वी त्यानं ‘बीपी’ चित्रपटाचीही निर्मिती केली होती. माऊली चित्रपटाचीही त्यानं निर्मिती केली. परंतु, हा चित्रपट अपयशी ठरला. २०१९ मध्ये त्याचे 'मरजावा' आणि 'हाऊसफुल ४' हे दोन चित्रपट यशस्वी ठरले.

रितेशने ह्या पूर्वी काही चित्रपटांची निर्मिती केली असली तरी वेद या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. ह्यात त्याची पत्नी जेनेलिया हिची प्रमुख भूमिका आहे.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र