अतिथी कट्टा

दिनांक :

थिएटरात नाटक आणि सिनेमा जेव्हा एकत्र नांदत होते…

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये `दशक्रिया` चित्रपटासाठी संजय कृष्णाजी पाटील यांना सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारीत) आणि `व्हेंटिलेटर` चित्रपटासाठी राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं या दोन मान्यवरांचे हे मनोगत.

संजय कृष्णाजी पाटील – या पुरस्काराच्या निमित्ताने सर्वप्रथम मी उल्लेख करेन तो राम कोंडिलकर याचा. कारण कोंडिलकर यांनी ‘दशक्रिया’ कादंबरीवर आपण चित्रपट करूया असे मला सांगितले होते. राम यांनी या कादंबरीचे लेखक बाबा भांड यांच्याशी माझी औरंगाबाद येथे भेट घडवली. ही कादंबरी प्रथम पाच वर्षे एका दिग्दर्शकाकडे आणि नंतर तेरा वर्षे दुसऱ्या दिग्दर्शकाकडे चित्रपटनिर्मितीसाठी होती. पण त्यानंतर काहीही घडले नव्हते. बाबा भांड यांनी परवानगी दिल्यावर गोष्टी आकार घेऊ लागल्या. संदीप पाटील या दिग्दर्शकालादेखील रामच माझ्याकडे घेऊन आला होता. मग लेखनाची- पटकथेची प्रक्रिया सुरु झाली. २०१३ पासून हे काम सुरु होते. आमच्या खूप चर्चा व्हायच्या. विलास कोठारे आणि कल्पना कोठारे यांनी निर्मिती करायची तयारी दाखवली. मी कोठारी यांच्या फार्म हाऊसवर जाऊन लिखाण करू लागलो. मग कास्टिंगचा विचार आला. यातील केशव भटजी या व्यक्तिरेखेसाठी आम्हाला मनोज जोशीच हवे होते. त्यांच्यासाठी आम्ही काही महिने थांबलो आणि त्या गोष्टीचे सार्थक झाले. मनोजने सुद्धा आम्हाला उत्तम सहकार्य दिले . त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार याच भूमिकेसाठी मिळतोय याचा खूप आनंद होतोय.
या चित्रपटासाठी आमच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. लोकेशनसाठी आम्ही सहा हजार किलोमीटरचा प्रवास केलाय. राजन गवस यांनी मला सांगितले की तुझा चित्रपट घडेल असे ठिकाण म्हणजे गारगोटी. तिथे आम्ही गेलो आणि आम्हाला लोकेशन सापडले. तिथे आम्ही शूटिंग केले. २०१६ साली शूटिंग सुरु झाले आणि ५५ दिवसांत चित्रपटाचे चित्रण पूर्ण झाले. ही गोष्ट आहे एका लहान मुलाची. ते काम आर्य आढाव याने केले आहे आणि त्याला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने आमच्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.

राजेश मापुस्कर आमच्या ओळखीच्या किंवा नात्यात अनेकदा असे घडले आहे की एखादी व्यक्ती रुग्णालयात व्हेन्टिलेटरवर आहे. असा प्रसंग अनेकांच्या नात्यात घडत असतो. त्यावेळी बाकीच्या लोकांच्या आयुष्यात नेमके काय घडते, जी व्यक्ती व्हेन्टिलेटरवर आहे, तिचे नातेवाईक कसे वागत असतील, हे सगळे मनात होते. मला या विषयावर कथा सुचू लागली होती. एका रात्रीत मी ३५ ते ४० पानी कथा लिहून काढली. यावर चित्रपट करायचा हे मनात होते. अनेकांनी मला यावर हिंदीत चित्रपट कर असे सांगितले.पण मला हा विषय मराठीतच करायचा होता, त्याबाबतीत माझा हट्ट कायम होता.
`व्हेन्टिलेटर`ची प्रक्रिया साधारण सहा महिन्यांची होती. माझ्या या कलाकृतीत रंग भरले, आहेत ते माझ्या सम्पूर्ण टीमने. प्रियांका आणि मधू चोप्रा यांनी मराठीत निर्मिती करायची तयारी दर्शवली आणि त्यातून चित्रपट घडत गेला. आशुतोष गोवारीकर यांनीसुद्धा आपल्या शेड्यूलमधून वेळ दिला. आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि माझी जबाबदारीही वाढली आहे. हे यश माझ्या एकट्याचे बिलकुल नसून सगळ्या टीमचे आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आहे. या चित्रपटात माझ्या मुलांनीसुद्धा काम केलंय. माझे सर्व कुटुंब यात आहे. या चित्रपटाच्या संकलनाला आणि साउंड मिक्सिंगसाठीदेखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला याचा मला आणखीनच आनंद आहे.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया